महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा फॉउंडेशनच्या यावल तालुका उपाध्यक्षपदी अय्युब खान

यावल प्रतिनिधी । येथील कॉंग्रेस कार्यकर्ते अय्युब खान यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा फॉउंडेशनच्या यावल तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

यावल येथील खरेदी विक्री संघाच्या सभागृहात झालेल्या पक्षाच्या बैठकीत अय्युबखान इसाखान (खिर्णीपुरा यावल) यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा फाउंडेशनच्या यावल तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असुन निवडीचे पत्र यावल रावेरचे विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते देऊन ही करण्यात आले. 

यावेळी जिल्हा परिषदचे गटनेते तथा काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष  प्रभाकर सोनवणे, काँग्रेस सेवा फॉउंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल, काँग्रेस शहराध्यक्ष कदीर खान, कॉंग्रेस कमेटीचे शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे , वाढोड्याचे सरपंच संदीप सोनवणे, काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हामीडिया प्रमुख तथा कोरपावलीचे सरपंच विलासभाऊ अडकमोल, काँग्रेस सेवा फोउंडेशनचे यावल शहराध्यक्ष नईम शेख, यावल शेतकी सहकारी संघाचे संचालक अमोल भिरुड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

Protected Content