४६ शिक्षकांना ‘विद्यार्थी प्रिय शिक्षक पुरस्कार’ जाहीर

sudant

 

फैजपूर प्रतिनिधी । येथील संतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूर यांचे मार्फत शिक्षक दिनाचे औचित्य साधत “विद्यार्थी प्रिय शिक्षक पुरस्कार” उपक्रम नुकताच राबविण्यात आला. या उपक्रमात परिसरातील २३ शाळांनी सहभाग नोंदविला होता. यात इ. ५ वी ते ७ वी आणि इ. ८ वी ते इ. १० वी अशा प्रत्येकी दोन गटातून शिक्षकांची निवड विद्यार्थ्यांकडून करण्यात आली असून त्यांना ‘विद्यार्थी प्रिय शिक्षक पुरस्कार’ जाहिर करण्यात आला.

पुरस्कारार्थी शिक्षक / शिक्षिकांची नावे पुढीलप्रमाणे :- शारदा माध्यमिक विद्यालय, न्हावी युवराज तळेले, नरेंद्र चौधरी 2) श्री.ग.गो.बेंडाळे विद्यालय, विवरा सबाजखाँ नवाब तडवी, नीलिमा नेमाडे, ३) कुसुमताई मधुकरराव चौ.माध्य.विद्या. फैजपूर ललित बोंडे, विनीत बोंडे, ४) नूतन माध्यमिक विद्यालय, चिनावल जी.बी.निळे, गिरीश भानुदास चोपडे ५) एल.एम.पाटील विद्यालय, राजोरा घनश्याम साळुंके, गिरीश पाटील ६) डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, सावदा विनोद चव्हाण, जगदीश धांडे ७) फातिमा उर्दू हायस्कूल, फैजपूर समीर बेग सलीम बेग, शकीला बानो रशीद खान ८) म्युनिसिपल हायस्कूल, फैजपूर हसीना जी.तडवी, अनिता बी. राजपूत ९) खिजर उर्दू हायस्कूल, चिनावल अब्दुल बसित रहेमान खान, तोसीफ अहमद खान इब्राहीम खान १०) आ.ग.म. विद्यालय सावदा पंकज जे. पाटील, संजय महाजन ११) शकुंतला जे. माध्यमिक विद्यालय, फैजपूर सदाशिव कापले, अजय महाजन १२) जे.टी.महाजन इंग्लिश/सेमी इंग्लिश मि. स्कूल, फैजपूर परेश चौधरी, मिलिंद कानडे १३) मौलाना उर्दू हायस्कूल (मुलांचे) (मुलींचे) फैजपूर शफिक सर, अजमल खान १४)घ.का.विद्यालय, आमोदे संजय बोठे, ललित पिंपरकर १५) श्री.स्वामीनारायण गुरुकुल, सावदा दीपमाला राधेशाम दाणी, संतोष पाटील १६) लोक विद्यालय, पाडळसे मनीषा सावकारे, संजय पाटील १७) प्रकाश विद्यालय, मोठे वाघोदा विनोद बाऱ्हे, वैभव चौधरी १८) विष्णू हरी पाटील कन्या शाळा, सावदा दिपाली चौधरी, निर्मला बेंडाळे १९)भारत विद्यालय, न्हावी दिपाली पाटील, प्रविण पाटील २०) नूतन माध्य. विद्यालय, अंजाळे सुनील सोनवणे, उल्हास पाटील २१) शांती विद्या मंदीर, वढोदा-प्र.सावदा हेमलता किरंगे, मुकेश तांबट २२) ज्योती विद्या मंदीर, सांगवी आर.डी.वाघुळदे, एम.एस.भटकर २३) झि.तो.महाजन व ना.भा.पाटील ज्यू.कॉलेज, धानोरा देविदास महाजन आणि वासुदेव महाजन यांना हा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.

पुरस्कार सोहळा महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरि जी महाराज यांचे अध्यक्षतेखाली दि.११ रोज बुधवारी ठीक ११.०० वाजता श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, भुसावल रोड, फैजपूर येथे मा.डॉ. मंजुषा क्षीरसागर, प्राचार्या DIECPD जळगाव, मा.श्री.बी.जे.पाटील (शिक्षणाधिकारी) माध्यमिक जि.प.जळगाव, मा.डॉ. राजेंद्र महाजन, अधिव्याख्याता DIECPD जळगाव, मा.एजाज शेख, गटशिक्षणाधिकारी-यावल, मा.श्री. विजय पवार गटशिक्षणाधिकारी-रावेर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. तर यासाठी सर्वांची आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

Protected Content