थोरगव्हाण जि.प.शाळेत वाचन कट्टा अन् आनंद मेळाव्याचे उद्घाटन

yawal news

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील थोरगव्हाण येथील जि.प.च्या प्राथमिक शाळेत विद्यार्थाना वाचण्याची गोडी लागावी म्हणून शाळेत वाचन कट्टा उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असुन या उपक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापक समीतीचे अध्यक्ष घनश्याम झुरकाळे यांचाहस्ते करण्यात आले.

शाळेचे मुख्याध्यापक महेद्र देवरे, उपशिक्षक निलेश पाटील, एकनाथ सावकारे व शाळा व्यवस्थापन समीतीच्या सहकार्याने  शाळेत मुलांना शिक्षणाची व वाचण्याची गोडी निर्माण व्हावी या दृष्टीकोणातुन वाचन कट्टा व बाल आंनद मेळाव्याची सुरवात करण्यात आली असुन या उपक्रमाला विद्यार्थी आणी पालकवर्गा कडुन चांगला प्रतिसाद मिळत आहे.

याकरीता विद्यार्थ्यांना वर्तमानपत्र विविध देशभत्ती साकृतिक व धार्मिक पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. या कार्यक्रमा अंतर्गत बाल आंनद मेळाव्यात विद्यार्थानी शाळेत आठवडे बाजार भरविण्यात आला.यात गावातील पालक महिला यांनी विविध भाजीपाला व खाद्य पदार्थ खरेदी करुन विद्यार्थाना खरेदी विक्री करण्याची सवय मिळाली या कार्यक्रमास देखील चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाला सरपंच उमेश सोनवणे, माजी उपसरपंच समाधान सोनवणे, शाळा व्यवस्थापन समीतीचे उपाध्यक्ष निवृती चौधरी, पत्रकार गोकुळ कोळी, विनोद भालेराव, विनोद पाटील, ग्रा.पं. सदस्य अनिल भालेराव, गोपाल चौधरी, पद्ममाबाई पाटील, सुरेश चौधरी, जीवन पाटील, चेतन पाटील, सोपान पाटील, दिवाकर चौधरी, प्रविण पाटील, शिवाजी पाटील, नवल सोनवणे, योगेश कोळी, सतीश गांवडे, संजय चौधरी उपस्थिती होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक निलेश पाटील यांनी केले. आभार निलेश धर्माराज पाटील यांनी मानले.

Protected Content