ताप्ती पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

warshik sneha sammelan

भुसावळ प्रतिनिधी । येथील ताप्ती पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन पार पडले. यामध्ये त्यांनी विविध गाण्यांवरती नृत्य सादर केले तसेच काही नाटिका सादर केल्या.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष भुसावळ विभागाचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, नाहाटा महाविद्यालयाचे प्राचार्या मिनाक्षी वायकोळे हे होते. तर प्रमुख पाहुणे ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सेक्रेटरी विष्णु चौधरी हे होते. या वार्षिकस्नेह संमेलनामध्ये शाळेतील नर्सरी ते इयत्ता दुसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

यामध्ये त्यांनी विविध गाण्यांवरती नृत्य सादर केले तसेच काही नाटिका सादर केल्या. ज्यामध्ये वडील आणि मुली मधील जन्मापासून ते मुलीच्या लग्नापर्यंतचे नाते अतिशय उत्कृष्ट रीत्या सादर केले. ज्याला उपस्थित सर्व पालक प्रेक्षक वर्गांनी भरभरून दाद दिली. सदर स्नेह संमेलनाचे संचालन शाळेतील शिक्षिका सोफिया पीबॉडी व प्रिया रायन यांनी केले. स्नेह संमेलनाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका नीना कटलर, शाळेचे सर्व शिक्षक वृंद तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content