जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ताम, मुंबई आणि जैन स्पोर्टस् अकॅडमी व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ ते २८ जानेवारी २०२३ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल जळगाव येथे ३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो क्युरोगी व पुमसे ( ज्युनिअर/सिनीयर ) स्पर्धेचे आयोजन येथे करण्यात आले असून जळगाव होणाऱ्या राज्यस्तरीय कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो स्पर्धेची तयारी पुर्णत्वाकडे आहे.
सदर स्पर्धेत आतापर्यंत २५ जिल्ह्यातील खेळाडूंचा सहभाग निश्चित झाला आहे या स्पर्धा इलेक्ट्रॉनिक स्कोरींग सिस्टीम (सेन्सर्स) वर घेण्यात येणार आहेत असे जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे सचिव अजित घारगे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
या स्पर्धेत क्युरोगी या प्रकारात १० मुलं व १० मुली अशा २० विविध वजनी गटात या स्पर्धा रंगणार आहेत तर पुमसे स्पर्धा या वैयक्तिक, पेअर्स व सांघिक मुलं व मुली अशा प्रकारात होणार आहेत, साधारण ५०० च्यावर खेळाडू , संघ प्रशिक्षक व व्यवस्थापक, पंच, स्वयंसेवक समावेश आहे.