धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने अनोळखी पुरुषाचा जागीच मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रूळ ओलांडत असतांना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने एका अनोळखी पुरूषाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी २४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव रेल्वे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव रेल्वे स्थानकाच्या जवळ अंदाजे ५० ते ५५ वर्षीय एका अनोळखी पुरूष हे मंगळवारी २४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता रेल्वे खंबा क्रमांक ४२०/१०५५ जवळून रेल्वे रूळ ओलांडत असतांना गोदान एक्सप्रेस या धावत्या रेल्वेचा जोरदार धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. दरम्यान मयताची कोणतीही ओळख पटलेली नाही. मयताच्या उजव्या हातावर मोहन असे गोंदलेले नाव आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन जळगाव रेल्वे पोलिसांनी केले आहे. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला आहे. या घटनेबाबत रेल्वे स्टेशन प्रबंधक एस.एस. ठाकूर यांनी दिलेल्या खबरीवरून रेल्वे जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.कॉ. सचिनकुमार भावसार करीत आहे.

Protected Content