जुन्या वादातून तरूणाच्या डोक्यात टाकली लोखंडी खूर्ची

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील फुले मार्केट येथे जुन्या वादातून दुकानदार तरुणाला एकाने दारुच्या नशेत लोखंडी खुर्ची मारुन जखमी केल्याची घटना घडली. याबाबत जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे.

शहर पोलीसांनी दिलेल माहितीनुसार, शिवाजीनगर दालफळ भागात महादेव मंदिराजवळ अजय राजेंद्र चौधरी (वय-३०) हा तरुण राहतो. त्याचे फुले मार्केट येथे दुकान आहे. रविवारी २६ जून रोजी  नेहमीप्रमाणे दुकानावर काम करत असतांना दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास दालफळ येथे राहणारा बंटी शर्मा ऊर्फ शुभम हा आला. त्याने दारुच्या नशेत जुन्या वादातून अजय चौधरी यास शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण करण्यात सुरुवात केली. याच दरम्यान बंटी याने  दुकानावरील लोखंडी खुर्ची अजय याच्या डोक्यात मारुन दुखापत केली. या घटनेत अजय चौधरी हा जखमी झाला आहे. याप्रकरणी अजयने दिलेल्या तक्रारीवरुन बंटी ऊर्फ शुभम याच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय भदाणे हे करीत आहेत.

Protected Content