३० लाख सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोनसचा लाभ

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । देशात मागणी वाढावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. त्या प्रयत्नांचा भाग म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाने वित्तीय वर्ष २०१९-२० साछी प्रोडक्टिव्हीटी आणि नॉन-प्रोडक्टिव्हीटी लिंक्ड बोनसची घोषणा केली आहे. ३० लाख ६७ हजार विना-राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे.

या घोषणेनंतर सरकारी तिजोरीवर ३,७३७ कोटी रुपयांचा भार वाढणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही बोनसची रक्कम सिंगल इन्स्टॉलमेंटमध्ये जारी केली जाईल असे म्हटले आहे. ही रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे विजयादशमीच्या पूर्वीच सर्व कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना जारी केली जाणार आहे.

या पूर्वी सरकारने LTC कॅश व्हाउचर योजना आणली होती लिव्ह ट्रॅव्हेल कॉम्पेनसेशनचा फायदा ४ वर्षांच्या ब्लॉकमध्ये मिळतो. तो ब्लॉक याच वर्षी २०२० मध्ये समाप्त होत आहे. कोरोनामुळे लोक घरातून बाहेर पडत नाहीत. अशात LTC च्या तिप्पट पैसा खर्च करून फायदा घेतला जाऊ शकतो, असे सरकारने म्हटले होते. या व्यतिरिक्त फेस्टिव्हल अडव्हॉन्सची देखील सरकारने घोषणा केली होती.

Protected Content