आक्षेप निवारण समितीतर्फे समस्यांचे निराकरण व्हावे

 

भुसावळ, प्रतिनिधी । जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे खाजगी रुग्णालयांच्या बिलांचे ऑडीट करण्यासाठी सहा सदस्य असलेली “ आक्षेप निवारण समिती” गठीत करणार आहेत. या समितीची आठवड्यातून किमान दोन वेळा जिल्ह्या रुग्णालयात बैठक आयोजित करावी आणि संबंधित तक्रारदार रुग्ण,नातेवाईक,रुग्णालय प्रशासन यांचे म्हणणे एकूण निराकारण करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीतर्फे करण्यात आली आहे.

शासनाच्या सुधारित परिपत्रकानुसार १००% बिलांचे ऑडीट न करता इन्शुरन्स असलेले,परतावा मिळणारे,व २०% कोट्यातील रुग्णांचे बिल वगळून इतरांचे बिल संबंधात तक्रारी असल्यास ऑडीट होणार आहे. सर्व कोविड आजारातून बरे/मृत्यू झालेल्या रुग्णांना अथवा नातेवाइकांना सर्व केस पेपरची छायांकित प्रत लगेच देण्यात यावी,कारण असेही रुग्णालयांन विमा कंपनी यांना खरी प्रत जमा करावी लागते. तेव्ह्या इतर कोरोना रुग्णांपण ती देण्यात यावी,यामुळे सदर रुग्ण त्यांच्या जवळच्या डॉक्टर कडून ते तपासेल आणि काही वाटल्यास तक्रार करेल अथवा ठराविक मुद्द्यावर स्पष्टीकरण व्हावे म्हणून ऑडीटची मागणी करेल, सरसकट मागणी करणार नाही.या छायांकित प्रतसाठीचा खर्च हा स्वत:हा रुग्ण करेल.

सर्व बिल,रक्त तपासणी रिपोर्ट बिल,इतर बिल यांची पूर्तता लगेच करण्यात यावी,कारण जर रुग्ण दगावल्यास नातेवाईक अंतसंस्काराच्या कार्यक्रमात व्यस्त होतात,मग विलंब होत जातो. “ आक्षेप निवारण समिती” आठवड्यातून किमान दोन वेळा जिल्ह्या रुग्णालयात बैठक घेणार असून त्याची जाहीर वर्तमान पेपरात जनहितार्थ माहिती देण्यात यावी. किती तक्रारी आल्या,कोणत्या रुग्णालयाच्या आल्या, किती दावे सेटल झाले, किती रुग्णांना रक्कम परत मिळाली आदी जाहीर करण्यात यावी अशी मागणी आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नितु पेटलं यांनी केली आहे.

Protected Content