नवी दिल्ली : वृत्तसंस्था | कोरोना पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेले आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं आता २८ फेब्रुवारीपर्यंत रद्दच राहतील.
खासकरुन काही रुटवरील आंतरराष्ट्रीय उड्डाणांना कॉम्पिटेंट अथॉरिटीकडून परवानगी दिली जाऊ शकते.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च २०२० पासून आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पण वंदे भारत मोहिमेअंतर्गत काही खास उड्डाणांनाच परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर जुलै महिन्यात निवडक देशांसोबत दोन पक्षीय एअर बबल करारानुसार विमान उड्डाणं करण्यात आली होती. भारताने अमेरिका, ब्रिटन, यूएई, भूतान आणि फ्रान्ससह २४ देशांसोबत एअर बबल करार केला आहे. या करारानुसार दोन्ही देशांमध्ये विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणं त्यांच्या एअरलाईन्सकडून संचलित केले जाऊ शकतात.