१५१ धावांवर आटोपला भारताचा डाव : आफ्रिदीची धारदार गोलंदाजी

दुबई वृत्तसंस्था | टी-२० विश्‍वचषकातील अतिशय वलयांकीत सामन्यात आज पाकिस्तानचा जलद गोलंदाज शाहीन आफ्रीदीच्या जबरदस्त कामगिरीवर भारताचा डाव १५१ धावांपर्यंतच मजल गाठू शकला.

पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मात्र शाहीन आफ्रिदीने पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूत भारताचा तडाखेबाज सलामीवीर रोहित शर्माचा बळी घेतला. त्याने रोहितला पायचित पकडलं. यानंतर तिसर्‍या षटकात शाहीननेचे सलामीवीर के एल राहुलचा त्रिफळा उडाला. यानंतर ऋषभ पंत आणि विराट कोहलीने सावधगिरीने फलंदाजी केली. ऋषभ पंत बाद झाल्यानंतर विराटने सूत्रे हाती घेऊन टोलेबाजी केली. मात्र दुसर्‍या बाजूने क्रमाक्रमाने फलंदाज बाद होत गेले. शेवटी विराटची झुंजदेखील संपली. आणि भारतीय संघ २० षटकांमध्ये ६ बाद १५१ इतकी धावसंख्या गाठू शकला.

यामुळे पाक संघासमोर जिंकण्यासाठी १५२ धावांचे टार्गेट असून यात ते यशस्वी होतात का याकडे सर्व रसिकांचे लक्ष लागले आहे.

Protected Content