१२ ऐवजी १३ ठिकाणी झाले बॉम्बस्फोट !

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – मुंबई येथे सन १९९३ मध्ये १२ बॉम्बस्फोट झाले, परंतु मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांची माहिती देताना १२ स्फोट झालेले असताना १३ ठिकाणी झाल्याचं मी सांगितले होते, आणि ज्यांना प्रश्नांचे गांभीर्य कळत नसेल तर ज्यांनी वक्तव्य केले असेल तर त्याची नोंद घेण्याचेही फारसे कारण नाही, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी जळगाव येथे आयोजित कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रपरिषदेत केले.

१४ एप्रिल रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद् फडणवीसांनी शरद पवार यांच्यावर ट्वीट केले होते, यात ट्वीटमध्ये १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर १३ वा बॉम्बस्फोट हा मुस्लिम वस्तीत झाल्याचे शरद पवार यांनी खोटे सांगितले असून अतिरिक्त बॉम्बस्फोटाची चुकीची माहिती दिली. कायदा आणि सुव्यवस्थेऐवजी लांगुलचालन करण्याला पवारांचे प्राधान्य होते असा आरोप ट्वीटद्वारे आहे. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या ट्वीटला पवारांनी आज जळगाव येथे उत्तर दिले.

पवार पुढे म्हणाले कि, हो, मुंबईच्या बॉम्बस्फोटांची माहिती देताना १२ स्फोट झालेले असताना ते १३ ठिकाणी झाले असून त्यात मुस्लीम भागाचं नाव सांगितले होते. हेहि तितकेच खरे आहे. याचे कारण, १२ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले तो परिसर सर्व हिंदुंचा होता. त्यासाठी जे साहित्य वापरले गेले ते साहित्य हिंदुस्थानात तयार होत नाही, ते कराचीत तयार होत असल्याची माहिती होती. यात बाहेरील देशांचा हात असून हिंदू-मुस्लिमांतील तेढ वाढविण्यासाठी कुणीतरी शेजारचा देशाचे काम होते. स्थानिक मुस्लीम नसून मोहम्मद अली रोड परिसरात स्फोट झाला असे सांगितल्यामुळे जातीय दंगली होणार होत्या, त्या झाल्या नाहीत.
या परकीय शक्तीच्या विरुद्ध उभे राहावे, या मताशी मुंबईतील हिंदू-मुस्लीम समुदाय एकत्र आले. त्यात नेमण्यात आलेल्या श्रीकृष्ण आयोगाकडून समन्स देखील आले. या चौकशीत विचारले गेले, कि १३ वा बॉम्बस्फोट या परिसरात झाला, त्यावेळी मी अशी भूमिका घेतली नसती तर अजून आग लागली असती, समाज हिताच्या दृष्टीकोनातूनच हा निर्णय होता आणि ज्यांना याचे गांभीर्य कळत नाही, त्यांनी अशी विधाने केली तरी त्याची फारशी नोंद घेण्याचे काही कारण नाही, असेही ते म्हणाले.

Protected Content