१० जूनपासून राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । कोरोना संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या  वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या तारखा राज्य सरकारने जाहीर केल्या आहेत. या   परीक्षा आता १० ते ३० जून दरम्यान घेण्यात येणार आहेत अशी माहिती   वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

 

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंदर्भात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांच्यासोबत मंत्रालयात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षांमध्ये एमबीबीएस, बीडीएस., बीएएमएस, बीयुएमएस, बी एचएमएस.,बीपीटीएच,बीओटीएच आणि बीएससी. नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांचा समावेश आहे.

 

या वैद्यकीय पदवी परीक्षांसोबतच मॉडन मिड लेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्स तसंच सर्टिफिकेट कोर्स इन फर्माकॉलॉजी या परीक्षाही या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

याआधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.  १९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या वैद्यकीय परीक्षा जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. अमित देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन पुढील ७२ तासांत निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली होती.  परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येणार आहे.

 

 

 

Protected Content