चोपडा महाविद्यालयाची गुणवत्तेची परंपरा कायम ; ९१.५५ टक्के निकाल

चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला,शास्र व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. शाळेचा निकाल ९१.५५ टक्के लागला आहे.

विज्ञान शाखेचा निकाल ९६.८५ टक्के लागला असून पाटील दुर्गेश नरेश याने ९१.२३ टक्के गुण प्राप्त करत प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे तर गाडिलोहार जयेश बापू याने ८९.८४ टक्के मिळवत दुसरे स्थान पटकविले. पाटील गौरव संजय याने ८९.०७ टक्के प्राप्त केल्याने त्याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

वाणिज्य शाखेचा। निकाल९५.०४ टक्के लागला असून अग्रवाल ख़ुशी रविंद्र ९१.३८ टक्के, अग्रवाल पलक मनोज ८९.५३ टक्के, पाटील चेतना छोटू ८६.१५ टक्के,गुजराथी राधा अनिल ८६.१५ टक्के गुण मिळवत अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. कला शाखेने हि ७७.०४ टक्के पर्यंत मजल मारत गुणवत्तेचा आलेख चढता ठेवला आहे. पाटील अक्षय रवींद्र ८०.०० टक्के ,ठाकरे भाग्यश्री सुनिल ७४.६१ टक्के, बोरसे कविता बाबुलाल ७४.४६ टक्के गुण मिळवत अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेत.

एम.सी.व्ही.सी.अर्थात किमान कौशल्य विभागातील इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजि विभागातून सोनगिरे अशोक धनराज ६५.३८ टक्के ,इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजि विभागातून पाटील योगराज अशोक ७१.५२ टक्के तर अकौंटिंग विभागातून शे.मुझाहीद शे.आसिफ यांना ६१.३८ टक्के गुण प्राप्त झाले आहेत. सर्व यशवंत विद्यार्थी, पालक व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे संस्थापक माजी आमदार डॉ.सुरेश जी.पाटील,संस्थेचे अध्यक्ष-अँड.संदीप सुरेश पाटील,उपाध्यक्ष-सौ.आशा विजय पाटील,सचिव-डॉ.स्मिता संदीप पाटील,प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी,रजिस्टार श्री.डी.एम.पाटील,उपप्राचार्य प्रा.एम.बी.हांडे,उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी,उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे,उपप्राचार्य प्रा.बी.एस.हळपे,पर्यवेक्षक प्रा.व्ही.वाय.पाटील.आदींनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.

Add Comment

Protected Content