जन आंदोलन खान्देशतर्फे बेकायदेशीर पदभरतीची चौकशीची मागणी

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्न महाविद्यालयात बेकायदेशीर प्राचार्य, प्रोफेसर, सहयोगी प्राध्यापक, लेक्चररच्या नियुक्तीची उच्च स्तरीय समिती मार्फत चौकशीची करण्याची मागणी जन आंदोलन खान्देशकडून मुख्यमंत्र्यांकडे  निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

                      

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळापासून पात्रता नसतांना सुध्दा आर्थिक देवाण-घेवाण करून प्राचार्य, लेक्चरर, सहयोगी प्राध्यापक, प्रोफेसर यांची नियुक्ती करण्यात आली. त्याची उच्च स्तरीय समिती गठीत करून चौकशीची मागणी जन आंदोलन खान्देशचे संस्थापक गौतम निकम यांनी केले आहे. या संदर्भात राज्यपाल, शिक्षणमंत्री, शिक्षण संचालक, संचालनालय पुणे यांच्याकडे दि.११-३-२०१८ आणि दि.१७-१२-२०१९ रोजी तक्रारी केलेल्या होत्या. मात्र तक्रार करूनही लुटूपुटूची चौकशी त्या समितीकडून करण्यात आली. क. ब .चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आर. एस. एस च्या दिलीप नावाच्या व्यक्तीने बेकायदेशीर सुर्यवंशी यांची निवड समितीवर नियुक्ती करून विद्यावर्धिनी महाविद्यालय धुळे येथे प्राचार्यपदी बसविले. मात्र स्थानिक व्यवस्थापनाने बडतर्फ केले. यादरम्यान सुर्यवंशी यांनी चाळीसगाव येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात बेकायदेशीर प्राचार्य नियुक्ती केले. नंतर या प्राचार्यानी मोठ्या प्रमाणात प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली. विशेष संस्थेच्या व्यवस्थापक मंडळला धर्मदाय आयुक्तांची मान्यता नाही. सुर्यवंशी महाशयांनी संपूर्ण विद्यापीठातील संलग्न महाविद्यालय बेकायदेशीर नियुक्ती करण्यात आल्या आहेत. कुलगुरू फक्त सह्याजीराव होते. प्रचंड स्वरूपात भ्रष्ट्राचार झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उच्च स्तरीय समिती मार्फत चौकशी करावी अशी मागणी जन आंदोलन खान्देशकडून करण्यात आली आहे. या निवेदनावर प्रा. गौतम निकम, डॉ. एस. एम. लंवाडे, ॲड. वाडिलाल चव्हाण, शत्रुघ्न नेतकर, विजय शर्मा, योगेश्वर राठोड, आबा गुजर बोरसे, नाशीर भाई शेख, मिलिंद अशोक भालेराव, गणेश भोई, प्रदीप चौधरी, अशोक राठोड, विजय चौधरी, आर. के. पाटील व भावराव गांगु आदींनी सह्या केल्या आहे.

Protected Content