खान्देशातील भूजल अभियानाचा जगात डंका : युनो मध्ये करण्यात आले सादरीकरण

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भूजल अभियान या वारकरी संप्रदायाच्या विचारांच्या आधारावर सुरू झालेल्या जल चळवळीचा अनुभव व कामाचा एकूण प्रवास सांगणारा व्हिडिओ युनोच्या न्यूयॉर्क येथील कार्यालयात ३९ देशांच्या प्रतिनिधी समोर सादर करण्यात आला. भूजल अभियान या चळवळीचा प्रवास भूजल अभियानाचे गुणवंत सोनवणे यांनी मांडला.

 

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात शाश्वत विकासावरील उच्च-स्तरीय राजकीय मंच अलीकडेच आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या अंतर्गत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये परिषदेच्या उच्च-स्तरीय विभागाचा भाग म्हणून मंचाच्या तीन दिवसीय मंत्री विभागाचा समावेश होता. यांच्या समोर भूजल अभियान चळवळीचे  कार्य सांगणार्‍या कामाचा व्हिडिओ कमिटमेंट सेक्शन या भागात दाखवण्यात आला.

 

या कार्यक्रमाची थिम कोरोनाव्हायरस रोग पासून पुनर्प्राप्तीचा वेग वाढवणे आणि सर्व स्तरांवर शाश्वत विकासासाठी २०३० अजेंडाची पूर्ण अंमलबजावणी अशी होती. फोरममध्ये, सहभागी कोविड-१९ साथीच्या रोगाचा शाश्वत विकास उद्दिष्टे (डऊॠी) वरील परिणामांना संबोधित करण्यासाठी प्रभावी आणि सर्वसमावेशक पुनर्प्राप्ती उपायांवर चर्चा झाली आणि २०३० चा अजेंडा आणि डऊॠी च्या सर्व स्तरांवर पूर्ण अंमलबजावणीसाठी कृतीयोग्य धोरण,मार्गदर्शन यावर चर्चा झाली. या कार्यक्रमाच्या अंतर्गत ३९ देशातील ३९ प्रतिनिधींनी सादरीकरण केले.

 

कोणतीही चळवळ ज्यावेळेस सुरू होते, ती चळवळ मदतीशिवाय उभी राहत नाही, त्याला भूजल अभियान देखील अपवाद नाही .लोकसहभाग आणि सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाच्या अंतर्गत सुरू झालेल्या भूजल अभियान या चळवळीला मुख्यतः नाम फाउंडेशन, तरपवशीश्ररपवश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मीडियाओशन आशिया प्रायव्हेट लिमिटेड, प्रयास,केअरिंग फ्रेंड्स, मानवलोक या सारख्या संस्थांच्या मदतीने वारकरी संप्रदायांच्या विचारावर आधारित लोकांनी लोकांसाठी सुरू केलेली चळवळ आहे.

 

युनो मध्ये दाखवण्यात आलेल्या भूजल अभियानाच्या चळवळीच्या चित्रफितीमध्ये सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाच्या अंतर्गत ५ वर्षापूर्वी सुरू झालेल्या चळवळीचा प्रवास मांडण्यात आला. भूजल अभियान ही वारकरी संप्रदायाच्या विचारांच्या आधारावर सुरू झालेल्या चळवळीच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यातील साधारण ४० गावांमध्ये जल संधारण व जल व्यवस्थापनाची कामे सुरू आहेत. या चळवळीत काम करणारे स्वयंसेवक हे भूजल वारकरी या नावाने ओळखले जातात, व  गावामध्ये अशा भूजल वारकर्‍यांची ६ ते १० सदस्यांची अशी भूजल पाणी समिती असते. या समितीचा एक प्रमुख असतो त्याला भूजल दिंडी प्रमुख असे संबोधण्यात येते.

 

भूजल अभियानाच्या एकूण ५ वर्षाच्या प्रवासात अनेक उपक्रम हाती घेण्यात आले त्यातील

१ गाव १ तलाव हा उपक्रम भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी सक्षम ठरत आहे. आतापर्यंत १६ गावांमध्ये २१ तलाव निर्माण करण्यात आले. वृक्षदिंडी उपक्रमाच्या अंतर्गत पाच गावांमध्ये साधारणतः २५००० पेक्षा जास्त वृक्षांचे वृक्ष संवर्धनाचे काम चालू आहे. साधारण २६ किलोमीटर एवढे अंतराचे पानंद रस्ते शेतकर्‍यांसाठी भूजल अभियानातून निर्माण करण्यात आले.

 

आत्तापर्यंत भूजल अभियानाच्या माध्यमातून विविध संस्थांच्या मदतीने व लोकसहभागातून एकूण ५०० कोटी लिटरपेक्षा जास्त भूपृष्ठावरील जलसाठा निर्माण करण्यात आला आहे. त्याचा साधारण ७०००० ते ८०००० हजार शेतकर्‍यांना फायदा झाला आहे. त्यासोबतच एक गाव एक तलाव या संकल्पनेमुळे उन्हाळ्यात देखील बर्‍याच तलावांमध्ये मुक्या जनावरांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.

 

एकंदरीत भूजल अभियानाचा उद्दिष्ट हे गावागावात जलसाक्षरता निर्माण करणे असून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवणे व जलसाक्षर भूजल वारकरी निर्माण करणे हेच आहे.

 

ही चळवळ खर्‍या अर्थाने भूजल वारकरी व दिंडी प्रमुखांची आहे जी लोक सहभागातुन कार्यरत आहे.

या अभियानात सुचित्रा पाटील चाळीसगाव; सोमनाथ माळी ब्राह्मण शेवगे;रावसाहेब पाटील आडगाव; राहुल राठोड -आभोने तांडा; दयाराम सोनवणे, शाम सोनवणे- कळमडू

तुषार पाटील राजमाने; नवल पवार ड्ढ दहीवद; काकासाहेब माळी पोहरे; संजय पाटील खेडी; घनश्याम पाटील शिदवाडी; खुशाल अहिरे,दस्केबर्डी; सुनील चव्हाण सुंदर नगर; नवनाथ राठोड सुंदर नगर; रुपेश राठोड कृष्णापुरी; विकास राठोड वरखेडे तांडा; अमोल गायकवाड चिंचगव्हाण; प्रमोद निकम लोंढे; भूषण देवकर पळासरे; भागवत बैरागी कुंझर; जिजाबराव सोनवणे ,खडकी सिम; गोकुळ पाटील जामदे; उदय पाटील चहार्डी; किशोर शेवरे वडाळा; शैलेश पाटील मळगाव; दिनकर राठोड चैतन्य तांडा; पवन पाटील ,रवींद्र मराठे – तरवाडे

राहुल पाटील – वाघडू; योगेश सोनवणे,पिंटू निकम, सारंग पाटील, विशाल कोठावदे,धर्मराज अहिरराव,पंकज राठोड, योगेश राठोड, अशोक आमले, राजेंद्र पवार, हरदास मोरे, निलेश अहिरे, बन्सीलाल पाटील असे अनेक दिंडी प्रमुख व भूजल वारकरी आप आपल्या गावात भूजल चळवळ रुजवत आहेत. या कार्याबद्दल एकूणच भूजल अभियानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Protected Content