शाळेची घंटा आज वाजलीच नाही …! केव्हा सुरू होणार ? पालक चिंतेत

 

जळगाव प्रतिनिधी। दरवर्षी प्राथमिक शाळा 15 जून ला सुरू होत असतात , मात्र कोरोनाच्या महामारीमुळे शाळा सुरू होणार नसल्याचे शासनाने जाहीर केले आहे .

शाळा सुरू होणार की नाही असा गोंधळ अनेक दिवसांपासून सुरू होता.शाळेचे संचालक आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊ नये असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत , मात्र आता शिक्षकांनी ‘ वर्क फ्रॉम होम ‘ करावे , लवकरच नव्याने तारीख जाहीर करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आहे . दरम्यान शेकडो पालकांनी लॉकडाऊन च्या काळातही आपल्या पाल्यांसाठी शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी दुकानांवर गेल्या आठ दिवसांपासून गर्दी केल्याचे दृश्य दिसून आले .यंदाचं शैक्षणिक वर्ष वाया तर जाणार नाही न ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव हा अजून काही कमी झालेला नाही .मुलांना कसे शाळेत पाठवायचे असा विचार पालकही करत आहेत .शाळा जर सुरू झाल्या तर थर्मल स्क्रिनिंग मशीनद्वारे विद्यार्थ्यांची तपासणी करणे ही तितकेच गरजेचे असणार आहे .त्याचप्रमाणे मास्क , सॅनिटाईझरची सक्ती ही असणारच आहे.शाळा सुरू करण्याबाबत शासनाच्या विविध विभागामार्फत मार्गदर्शक तत्व तयार केली जात आहेत .लवकरच नव्याने तारीख जाहीर होईल असे शासनाने कळविले आहे.

Protected Content