किनोद येथे बंद घरातून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबविली

जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील किनोद येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने व रोकड असा एकुण १ लाख रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगलेश्वर दिनकर पाटील (वय-३२) रा. किनोद ता. जि.जळगाव हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १२ जानेवारी ते कुटुंबियांसह जेवण करून झोपले असता मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण १ लाख रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार १३ जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आला. याप्रकरणी मंगलेश्वर पाटील यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जळगाव तालुकापोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ बापू पाटील करीत आहे.

 

Protected Content