पेरणीसाठी लागणारे रासायनिक खते जुन्या किंमतीत खरेदी करण्याचे आवाहन

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोणत्याही कृषि केंद्रावर रासायनिक खते खरेदी करतांना जुन्या किंमतीप्रमाणे खतांची खरेदी करावी अश्या सुचना कृषि अधिकारी डी.पी. कोते यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्यांपासून तर शेतकरी बांधव हे देखील दुहेरी संकटात सापडले आहे. अश्या परिस्थितीत यंदाच्या खरीपपुर्व मशागतीच्या कामास वेग आला असल्याने यंदा पिकांना लागणारी रासायनिक खतांच्या किंमती मोठया प्रमाणावर वाढविण्यात आले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

यावल पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी.पी. कोते तथा तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी शेतकऱ्यांनी तालुक्यातील कोणत्याही कृषि केंद्रावर रासायनिक खते खरेदी करतांना तपासणी करून जुन्या किंमतीप्रमाणे रासायनिक खतांची खरेदी करावी, दरम्यान जुन्या साठवनीत असलेल्या किंमतीपेक्षा अधिक भावाने कुणी खते विक्री करीत असल्यास व शेतकरी बांधवांची आर्थीक फसवणुक करीत असले तर त्याची तक्रार सरळ शेतकऱ्यांनी पंचायत सामितीचे कृषी अधिकारी डी. पी. कोते यांच्याशी तात्काळ दुरध्वनी क्रमांक ९८३४९८२४४२ या ठीकाणी संपर्क साधावा तथा रासायनिक खते खरेदी केल्याच्या बिल पावतीसह तक्रार अर्ज द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content