Snake bites : सर्पदंशाने आदिवासी तरूणीचा दुदैवी मृत्यू !

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या (Satpuda mountain) अतिदुर्गम क्षेत्रातील गाडऱ्या गावातील २३ वषीय आदीवासी तरूणीचा सर्पदंशाने (Snake bites) दुदैवी मृत्यू झाल्याची घटना सकाळी घडली.

 

याबाबत माहिती अशी की, फुलगी भाया बारेला (वय-२३) रा. गाडऱ्या ता. यावल ही तरूणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. नेहमीप्रमाणे गाडऱ्या शिवारातील शेतात मंगळवारी १२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता कुटुंबियांसह तूर कापण्यासाठी शेतात गेली होती. सकाळी ९ वाजेच्या सुमारास तूर कापत असतांना तिला विषारी सापाने दंश केला. अत्यंत विषारी सापाने दंश केल्याने तरूणीचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सरपंच भरत बारेला, पोलीस पाटील तेरसिंग बारेला व ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतली. गाडऱ्या गाव हे अतिदुर्गम भागातील आदीवासी गाव असल्याने मृतदेह आणण्यासाठी खासगी वाहनाने ८० किलोमीटर अंतराला सहा तास लागले. यावल ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तर पोलीस पाटील तेरसिंग बारेला यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहे.

Protected Content