रावेर (प्रतिनिधि) येथील स्टेशन परीसरातील होळ गावात सर्वधर्मीय महिलांच्या समुदयाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा मध्यरात्री बसविला आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने पुतळा हटवू नये म्हणून पहाटे सकाळी साडेतीन वाजेपासून पूतळ्यासमोर ठिय्या मांडला आहे.
याबाबत वृत्त असे की, महाराष्ट्रचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा होळगावात मध्यरात्री बसविण्यात आला आहे. पुतळा काढण्यात येऊ नये म्हणून पुतळाच्या सरक्षंणासाठी पहाटे साडेतीन वाजेपासून पूतळ्यासमोरच ठिय्या मांडला आहे. दरम्यान, पुतळा आम्ही सर्वधर्मीयांनी बसवल्याचे नंदा बाविस्कर व निळे निशानचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी पत्रकारांना सांगितले. तालुक्याचे सर्व प्रशासकीय अधिकारी महाराजाच्या पूतळा बसविल्या ठिकाणी भेट दिल्या आहे.