…हे तर सुटाबुटातील लुटारू सरकार !- बाळासाहेब थोरातांची जोरदार टीका

मुंबई प्रतिनिधी । पेट्रोल व डिझेलवर वाढीव उत्पादन शुल्क लावण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी ‘हे सुटाबुटातील लुटारू सरकार’ असल्याची टीका केली आहे.

पेट्रोल, डिझेलच्या दरात आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्यानं घसरण सुरू असताना मोदी सरकारनं इंधनावरील उत्पादन शुल्क तीन रुपयांनी वाढवलं आहे. यामुळे सर्वसामान्यांना भुर्दंड पडणार आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्रसरकारवर टीका केली आहे.

थोरात यांनी ट्वीट करत म्हंटलं आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती ३०% नी कमी झाल्या असताना, देशात किंमती कमी करून सामान्यांना त्याचा लाभ देण्याऐवजी मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लि. ३ रू. वाढ करून सर्वसामान्यांचा खिसा कापण्याचा उद्योग सुरु केला आहे. त्यामुळे हे सुटबुटातील लुटारू सरकार असल्याची टीका थोरातांनी केली आहे.

Protected Content