दोन माजी पंतप्रधानांसह हरित क्रांतीच्या प्रणेत्यांना भारतरत्न !

नवी दिल्ली-वृत्तसंस्था | मोदी सरकारने आज माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग व पीव्ही नरसिंहराव यांच्यासह हरीत क्रांतीचे प्रणेते एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चौधरी चरणसिंह, पीव्ही नरसिंह राव आणि स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात येत असल्याची घोषणा केली. या तिन्ही मान्यवरांना मरणोत्तर हा पुरस्कार मिळणार आहे. या तिन्ही मान्यवरांनी देशाच्या विकासात मोलाची भर टाकली असून त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान, यंदा तब्बल पाच भारतरत्न प्रदान करण्यात आले आहेत. याआधी कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी यांना पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. या पाठोपाठ आता या तिन्ही मान्यवरांना हा पुरस्कार मिळणार आहे.

Protected Content