सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । लॉकडाऊनमध्ये येथील हॉटेल हिना पॅलेसमधील दारू चोरीच्या बनाव प्रकरणी अजून पाच जणांना अटक करण्यात आली असून आधी अटक केलेल्यांचा जामीन न्यायालयाने नामंजूर केला आहे.
सावदा येथील हॉटेल हिना पॅलेस मधील साडेचार लाखाची दारूची विक्री केल्या प्रकरणी आता पर्यंत हॉटेल चालक सह एकूण ११ जनावर गुन्हा दाखल झाला आहे. यातील सुरवातीस अटक झालेल्या मुख्य संशयीत कृष्णा कोष्टी सह सात जणांंचां जमीन नामंजूर झाला आहे. तर पोलिसांनी निखिल काशिनाथ पाटील, निलेश इंगळे, प्रशात वारके, किरण शिंपी,करण रोझोदकर यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. या प्रकरणी हॉटेल चालक व मुुुख्य संशयीत कोष्टी याने पोलिसााना जवळ पास २२ जणाची नावे सांगितली आहे. यातील काही जण अजून बाकी आहेत. यामुळे आता या प्रकरणात अजून कोणाला अटक होते या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००