गेंदालाल मिल परिसरात मेडीकल स्टोअर्स फोडले; २७ हजाराची रोकड लंपास

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गेंदालाल मिल परिसरातील मेडीकल स्टोअर्स अज्ञात चोरट्यांनी फोडून गल्ल्यातील २७ हजार रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू आहे.

याबाबत माहिती अशी की, बाळासाहेब लक्ष्मण पाटील (वय-४७) रा. दादावाडी, जळगाव यांचे गेंदालाल मिल परिसरात रामकृष्ण मेडीकल दुकान आहे. हे दुकान गेल्या २०-२५ वर्षांपासून ते चालवत आहे. मंगळवारी रात्री ११ वाजता त्यांनी मेडीकल बंद करून घरी गेले. आज सकाळी दुकानासमोर चहाचे टपरीवाल रविंद्र मंडलिक याला दुकानाचे कुलूप तोडल्याचे लक्षात आल्याने त्यांनी बाळासाहेब पाटील यांना फोन दुकानात चोरी झाल्याचे सांगितले. पाटील यांनी तत्काळ मेडीकलवर धाव घेतली असून दुकानात चोरी केल्याचे लक्षात आले. दरम्यान दुकानातील गल्ल्यातील २७ हजार रूपयांची रोकड लंपास केली आहे.

दरम्यान, बाळासाहेब पाटील हे दररोज गेंदालाल मिल परीसरात १२ वाजेपर्यंत नागरीकांशी गप्पा मारत रात्री उशीरापर्यंत घरी जातात. मात्र काल ते आले नसल्याचे हा प्रकार झाला आहे. शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव पंचनामा करण्याचे काम सुरू होते.

Protected Content