श्रीनगर वृत्तसंस्था । आज भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले असून यात हिज्बुल मुजाहिदीन या कुख्यात दहशतवादी संघटनेचा मोस्ट वाँटेड कमांडर रियाज नायकू याचा समावेश आहे.
आज सकाळपासूनच सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज नायकू याचा यात समावेश आहे. रियाज हा सर्वात धोकायदाक आणि सक्रीय दहशतवाद्यांपैकी एक होता. अनेकदा सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये तो थोडक्यात बचावला होता. अनेकदा त्याने व्हिडिओ मेसेजेसच्या माध्यमातून दहशतवादी हल्ल्यासंदर्भात इशारे जारी केले होते. सुरक्षा दलांनी रियाजचा समावेश ए प्लस प्लस कॅटेगरीच्या दहशतवादींच्या यादीमध्ये केला होता. यामुळे त्याला ठार केल्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणांना मोठे यश लाभल्याचे मानले जात आहे.
रविवारी हंदवाडा येथे झालेल्या चकमकीत दोन अधिकार्यांसह तीन जवान असे एकूण पाच जण शहीद झाले होते. तर सोमवारी हंदवाडा येथे चेकपॉईंटवर झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले. या पार्श्वभूमिवर भारतीय जवानांनी दहशतवाद्यांविरूध्द व्यापक मोहीम उघडली असून यात आज दोघांना यमसदनी पाठविण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००