‘चांद्रयान ३’मध्ये कोणताही बदल नाही – डॉ. के. सिवन

isro k sivan

पुणे प्रतिनिधी । ‘चांद्रयान ३’ मोहिममध्ये नवे कोणतेही बदल करण्यात येणार नाही, तसेच ही मोहीम चांद्रयान-२ प्रमाणेच राहणार असून यामध्ये कोणतेही मॉडिफिकेशन करण्यात येणार नसल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी नुकतीच दिली आहे.

‘चांद्रयान ३’, ‘गगनयान’, ‘आदित्य एल वन’ मोहीम नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार असल्याची पुष्टीही डॉ. सिवन यांनी दिली. मुक्तांगण विज्ञानशोधिकेत आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. डॉ. सिवन म्हणाले की, ‘चांद्रयान ३’मध्ये नवे कोणतेही बदल करण्यात येणार नाहीत. यामध्ये लँडर आणि रोव्हर प्रोपल्शन मॉड्युलमध्ये राहणार असून, ज्या ठिकाणी ‘चांद्रयान २’चे लँडर क्रॅश झाले होते, त्याच ठिकाणी ‘चांद्रयान ३’चे लँडर उतरणार आहे.’ ‘आदित्य एल वन’बाबत डॉ. सिवन म्हणाले, ‘आदित्य एल वनची मोहीम ही सूर्याचा अभ्यास करण्यासाठी राहणार आहे. सूर्याच्या जवळील पाच बिंदू आहेत. त्यापैकी एका बिंदूचे नाव ‘लिबरेशन पॉइंट’ असून, हा पॉइंट सूर्य आणि पृथ्वीला जोडणाऱ्या मार्गावर अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे.

Protected Content