हिंगोणे सरपंचांना धमकी : ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील हिंगोणा गावाचे ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी आदिवासी महिला सरपंच यांना धमकी देवून मानसिक छळ करत खंडणीची मागणी केली आहे. याची आदिवासी विशेष कायद्यांतर्गत चौकशी करून संबधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचतर्फे  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सहाय्यक गटविकास यांच्या मार्फत देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

 

या संदर्भात दिलेल्या निवेदनात आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच , महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  एम. बी. तडवी यांनी म्हटले आहे की, हिंगोणा ग्रामपंचायतीवर आदिवासी तडवी समाजाची महीला रूखसाना फिरोज तडवी या सरपंचपदाचा कारभार सांभाळत आहेत.  ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील विकास कामे ही पारदर्शी व्हावी याची जबाबदारी सरपंच आणि ग्रामसेवक यांची असते. परंतु, हिंगोणा गांवातील विकासकामे ही मर्जीतील ठेकेदार यांच्या वतीने होत असल्याचे सरपंच रूखसाना तडवी यांनी आरोप केला आहे.  संबधीत कामांच्या कार्यपद्धतीबद्दल सरपंच यांनी ग्रामसेवक यांना डीएससी गैरवापर होत असल्याबाबतच्या सुचना दिल्या असतांना ग्रामसेवक आर. टी. बाविस्कर यांनी या गंभीर विषयाकडे टाळाटाळ करीत दुर्लक्ष केले.  ग्रामसेवक यांनी टेंडर प्रक्रीयेत घोळ करून बेकाद्याशिररित्या ठरावीक किंवा ठरलेल्या एकच ठेकेदारास लाखो रुपयांची बांधकाम भ्रष्ट्राचार करण्याच्या हेतुने दिली आहे. अशा प्रकारची लाखो रुपयांची बेकाद्याशीर कामे करून सरपंच यांच्यावर डीएससी मिळवण्यासाठी वरिष्ठांकडे खोटया तक्रारी करण्यात आल्या आहेत.  काही गुन्हेगार वृत्तीची ठेकेदार मंडळी यांनी या आधीच इतर ग्रामपंचायतींच्या घेतलेल्या कामांची विशेष पोलीस पथकाच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी.  ग्रामविकास विभागाच्या निविदा प्रणाली नियमानुसार ग्रामसेवक आर. टी. बाविस्कर हे ई – टेंडर करीत नसुन बेवसाईटवर बांधकामाची निविदा प्रक्रीया करण्यासाठी ग्रामसेवक हा सरपंच यांची डीएससीचा बेकायद्याशीर पद्धतीने गैरवापर करून बांधकाम टेंडर हे शासनच्या ई-टेंडर बेवसाईटवर काही वेळेसाठी प्लेस करतात व त्यानंतर हाईड करतात व ते काम असे करीत असतांना सदरचे काम बद्दलची माहिती ऑनलाईन इतरांना दिसत नसल्याने इतर ठेकेदारांना टेंडर भरता येत नाही.  अशा प्रकारे ग्रामसेवक यांच्या व काही स्वार्थी मंडळींच्या संगनमतांने हा सर्व घोळ आपल्या मर्जीतील ठेकेदाराच्या पदरात बांधकाम पाडत असतात.  या सर्व प्रकारामुळे इतर  होतकरू सुशिक्षीत बेरोजगार अभियंता यांना संधी मिळत नसत्याचे चित्र निर्माण झाले आहे. या सर्व प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर तात्काळ चौकशी करण्यात येवुन कायद्या दुरुपयोग करून आदिवासी  समाजातील महिला सरपंच यांना आर्थिक स्वार्थासाठी धमकी देवुन मानसिक छळ करणारे शासकीय अधिकारी व या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे एम. बी. तडवी यांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष सरदार बलदार तडवी व आदिवासी समाजातील असंख्य  महीलांच्या वतीने देण्यात आले आहे.  मागणी मान्य न झाल्यास  संघटनेच्या वतीने तिव्र आदोंलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

 

Protected Content