चाळीसगावातून दुचाकीची चोरी; गुन्हा दाखल

two wheeler theft

चाळीसगाव प्रतिनिधी | शहरातील स्टेशन रोड येथील कापड दुकानासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील स्टेशन रोड भागातून सागर कापड दुकान या गजबजलेल्या ठिकाणाहून जितेंद्र बंडू शेटे रा.वामन नगर करगाव रोड यांची हिरो होंडा एमएच 19 3408 ही 29 ऑक्टोबर रोजी अज्ञात आरोपीने चोरून नेली असून याबाबत चाळीसगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. जितेंद्र शेटे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक अभिमान पाटील करीत आहेत.

Protected Content