आशादीप महिला वस्तीगृहात मनियार बिरादरीतर्फे दिवाळीनिमित्त फराळासह कपडे वाटप

जळगाव प्रतिनिधी । जळगाव मुस्लिम मानियार बिरादरीतर्फे महिला व बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत जळगाव येथील आशादीप महिला वस्तीगृहात दिवाळीनिमित्त फराळ व नवीन कपडे वाटप करण्यात आले.

यावेळी महिला बाल कल्याण विभागाच्या समुपदेशक विद्या सोनार, शोभा हंडोरे व महिला सल्लागार समिती सदस्य निवेदिता ताठे, मानियार बिरदारीचे प्रदेशाध्यक्ष फारुक शेख, शहराध्यक्ष सय्यद चाँद, खजिनदार तय्यब शेख, सदस्य ॲडव्होकेट अमीर शेख, सहसचिव अल्ताफ शेख, आशादिप महिला वस्तीगृहाचे एस शेलोळे, एस ठाकरे व सुनंदा पोतदार आदी उपस्थित होते.

मुस्लिम मानियार बिरादरीचा गेल्या दहा वर्षापासून हा उपक्रम राबवला जात आहे. आशादीप मधील वस्तीगृहातील चिमुकल्यांना सुद्धा नवीन कपडेसह मिठाई मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. निवेदिता ताठे यांनी दरवर्षी होणाऱ्या या कार्यक्रमाची पार्श्वभूमी विशद केली. विद्या सोनार व शोभा हंडोरे यांनी शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या बाबत व मुस्लिम मानियार बिरदारीच्या कार्य बाबत माहिती सादर केली तर फारुक शेख यांनी पीडितां सोबत संवाद साधून त्यांना पूर्ण विश्वासात घेतले व आपणा सोबत आम्ही नव्हे तर सम्पूर्ण समाज आहे, आपण कडून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष चुका झाल्या असल्या तरी ते पुनःश्च होता कामा नये याची भविष्यात खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशादीप महिला वस्तीगृहाच्या सुनंदा पोतदार यांनी केले तर आभार कनिष्ठ लिपिक एस एस ठाकरे यांनी मानले.

Protected Content