डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात शालेय क्रीडा उत्साहात (व्हिडीओ)

Jalgaon 4

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ, विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ.अविनाश आचार्य विद्यालयात आज (दि.21) रोजी शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी मनपा स्थायी समिती सभापती ॲड. सुचिता हाडा, मुख्याध्यापिका योगिता शिंपी, शालेय समिती सदस्य रचना जोशी यांची उपस्थिती असून या मान्यवरांच्या हस्ते भोवरा व मैदान पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनीनी दंबेल्स, उड्या मारणे, रिंग व भोवरा फिरवणे इ. प्रात्यक्षिक सादर केले. या स्पर्धेत पारंपारिक, बौद्धिक व मनोरंजनात्मक मैदानी खेळ मुलांसाठी घेण्यात आले. यात इयत्ता 1ली अन् 2री या विद्यार्थ्यांसाठी अडथळा शर्यत, टायर फिरवणे, चक्रसाखळी इत्यादी खेळ होते. तर 3री आणि 4थी विद्यार्थ्यांसाठी चौकटीतील उड्या, अडथळा शर्यत व रस्सी खेच स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या प्रथम व्दितीय, तृतीय मुलांना मेडल देण्यात आले. स्पर्धेत मुलांमध्ये विशेष उत्साह होता. जल्लोषात मुलांनी आपल्या विजयी संघाचे कौतुक केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Protected Content