शिवसेनेचे निलेश चौधरी यांना विजयी करा : डी. जी. पाटील

nilesh patil

 

धरणगाव प्रतिनिधी । नगरपालिका नगराध्यक्ष पोट निवडणूकची रणधुमाळी सुरू झाली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेचे उमेदवार निलेश चौधरी यांना विजयी करा, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे प्रदेश सचिव डी.जी.पाटील यांनी केले. ते शिवसेनेची जी.एस.लॉन्स येथील आयोजित बैठकीत बोलत होते.

 

तत्पूर्वी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची पुण्यतिथीनिमित्ताने प्रतिमेस पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच आपल्या मनोगतात शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले की, शहरात विकास कामात शिवसेना अग्रेसर असून स्व.सलीम पटेल यांच्या स्वप्नातले धरणगाव शहर करण्यास कटिबद्ध असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तालुका प्रमुख गजानन महाजन यांनी आपल्या मनोगतात सांगितले निलेश चौधरी याचे विजय निश्चित असून कार्यकर्तेंनी जोमाने कामाला लागण्याचे आव्हान केले. तर शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन यांनी शिवसेना ही जातीपातीचे राजकारण केले नसून वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारणचा भरोसावर निवडणूक लढवत असतो. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार निलेश चौधरी यांनी आपल्या मनोगत सांगितले की, धरणगाव शहराचे विकासाचे मॉडेल तयार असून 90 कोटी पाईपलाईनचा आराखडा तयार झाला आहे. शहराला 2 दिवसात पाणीपुरवठा कसा दिला जाईल, असे निलेश चौधरी यांनी यावेळी सांगितले.

यावेळी काँग्रेसचे दिपक जाधव, संभाजी ब्रिगेडचे गोपाल पाटील, अपक्ष महेंद्र महाजन, शेख इसाक यांनी माघार घेतल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्व.सलीम पटेल यांचे बंधू फिरोज पटेल यांनी शिवसेना समजा पलीकडे नाते जपण्याच्या मार्गाने चालते. सलीम भाईंना जशी मुस्लिम समाजाने साथ दिली, तशीच निलेश यांच्यासाठी मुस्लिम समाज पाठीशी खंबीरपणे उभे राहिल, यावेळी पी.एम.पाटील, सुरेश भागवत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर उपस्थित माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, उषा वाघ, प्रभारी नगराध्यक्ष अंजली विसावे, लिला चौधरी, सी.के.आबा पाटील, उद्योग पती जीवन आपा बयस, महिला आघाडी शहर प्रमुख रत्ना धनगर, शिवसेनेचे व काँग्रेसचे सर्व नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण अग्निहोत्री यांनी तर आभार विनोद रोकडे यांनी मानले.

Protected Content