अहमदाबाद : वृत्तसंस्था । गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दीक पटेल यांच्या वडिलांचं करोनामुळे निधन झालं आहे. अहमदाबादमधील रुग्णालयात भरत पटेल यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी फोनवरून हार्दीक पटेल यांच्याशी संवाद साधत संवेदना व्यक्त केल्या. हार्दीक पटेल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
गुजरातमध्ये गेल्या २४ तासात ११, ८९२ जणांना लागण झाली आहे. त्यामुळे एकूण संख्या ६ लाख ६९ हजार ९२८ वर पोहोचली आहे. एका दिवसात ११९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत गुजरातमध्ये ८,२७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात १ लाख ४३ हजार ४२१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.