आमच्या वैज्ञानिकांनी कोरोनावर औषध शोधले ; हजाराहून अधिक रुग्ण बरे झाल्याचा पतंजलीचा दावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पतंजलीने कोरोनाचे औषध तयार करण्यात यश मिळवले आहे. या औषधाने आतापर्यंत एक हजार पेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत, असा दावा पतंजली आयुर्वेद कंपनीचे को-फाउंडर आचार्य बालकृष्ण यांनी केला आहे.

 

आचार्य बालकृष्ण यांनी सांगितले की, चीनमध्ये जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत होता तेव्हाच औषध तयार करण्याच्या दृष्टीने काम सुरु करण्यात आले होते. शेकडो वैज्ञानिकांनी दिवस-रात्र मेहनत घेतली. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून कोरोनावर मात करणारे औषध तयार झाले. वेदांचा अभ्यास, आयुर्वेदिक वस्तू आणि वैज्ञानिक सिद्धांताचा अवलंब करुन कोरोनावर औषध तयार करण्यात आल्याचे आचार्य बालकृष्ण यांनी सांगितले. त्यांनी 1 हजाराहून अधिक लोक या औषधाने बरे झाल्याचे देखील म्हटले आहे. आचार्य बालकृष्ण यांनी असा दावा केला की हे औषध बर्‍याच ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना देण्यात आले होते, त्यापैकी 80 टक्के लोक बरे झाले आहेत.

Protected Content