जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर भाजपचाच झेंडा – माजी मंत्री गिरीश महाजन (व्हिडीओ )

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला ८५ ते ९० टक्के यश आले आहे. महाविकास आघाडीला जामनेर तालुक्यात फारसं यश प्राप्त होणार नाही, असे मत माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी बोलतांना सांगितले.

आमदार महाजन पुढे म्हणाले की, जामनेर तालुक्यातच नाही तर जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टी पक्षाच्या ताब्यात राहतील असे देखील ते म्हणाले, जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची निवडणुक झाल्यानंतर आज मतमोजणी सुरू आहे. तालुक्यातील लिहे ग्रामपंचायतीवर भाजपाला ७ तर राष्ट्रवादी ४, पहूर ग्रामपंचायतीवर भाजपला ९ तर राष्ट्रवादीला ७, लोंढरी येथे भाजपाचे १० तर राष्ट्रवादीचे १, फतेपुर ग्रामपंचायतीवर भाजपाचे ६ तर राष्ट्रवादीचे ५, नाचणंखेडा येथे भाजपाला १३, पाळधी येथे भाजप 12, ढालगाव ग्रामपंचायतीवर भाजपाला ६ तर राष्ट्रवादीला ५, देवपिंप्री भाजपा ९ तर राष्ट्रवादी २ अशी आकडेवारी दुपारपर्यंत आली होती.

https://www.facebook.com/508992935887325/videos/417410879492105

Protected Content