हाथरस येथील पीडितेच्या दोषींना पाठीशी घालणारे योगी सरकार तात्काळ बरखास्त करा

 

यावल, प्रतिनिधी । उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार व अत्याचाराचा निषेध करून उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांचे सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती शासन लागू करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजीक न्याय विभाग यावल तालुक्याच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

हाथरस येथे घडलेल्या या घृणास्पद व निंदनीय प्रकारातील आरोपींना योगीचे गुंडाराज सरकार पाठीशी घातल असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या असुन उतरप्रदेशातील गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या योगी यांचे सरकार तात्काळ बरखास्त करून राष्ट्रपती शासन उतरप्रदेश मध्ये लावण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजीक न्याय विभाग यावल तालुक्याच्या वतीने करण्यात आली. तसेच संपुर्ण देशाला हादरून सोडणाऱ्या गुन्ह्यातील आरोपींचा खटला फास्ट ट्रॅक न्यायलयात चालविण्यात यावा व यातील गुन्हेगार नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली. निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार यांना देण्यात आलेल्या या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, सामाजीक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष सुकदेव पुंजाजी बोदडे, प्राचार्य जी. पी. पाटील , राष्ट्रवादी सामाजीक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस सारंगधर अडकमोल , सा.न्या. वि. जिल्हा उपाध्यक्ष युवराज गाढे, राष्ट्रवादी फैजपुर शहर अध्यक्ष अन्वर खाटीक, राष्ट्रवादी ओबीसी . सेलचे तालुका अध्यक्ष निवृत्ती गोविंदा धांडे , युवक राष्ट्रवादीचे अॅड . देवकांत पाटील, अशोक भालेराव फैजपुर , व्दारका पाटील , कामराज घारू, नरेन्द्र शिंदे , हितेन्द्र गजरे यांच्या स्वाक्षरी आहेत.

Protected Content