कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करणार

 

बंगळुरू : वृत्तसंस्था । उत्तर प्रदेश, हरियाणा पाठोपाठ आता कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करण्याचा विचार सुरू आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, त्यांचे सरकार लव्ह जिहाद संपुष्टात आणण्यासाठी कडक पावलं उचलणार आहे. आम्ही वृत्तपत्रं व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये लव्ह जिहादच्या माध्यमातून धर्म परिवर्तनाच्या बातम्या पाहिल्या आहेत. मी अगोदरच यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. इतर राज्य याबद्दल निर्णय घेतील की नाही याची मला पर्वा नाही, मात्र कर्नाटकात मला हे संपवायचे आहे. मला लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे. तीन दिवसांत आम्ही याबाबत निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

या अगोदर कर्नाटकचे गृहमंत्री बोमानी यांनी लव्ह जिहाद विरोधात कायद्याचे संकेत दिले होते. बरेच दिवसांपासून लव्ह जिहाद सुरू आहे. हा एक सामाजिक दानव आहे. असे त्यांनी म्हटले होते. आम्ही कायदेतज्ज्ञांशी चर्चा करत आहोत, असे देखील ते म्हणाले होते.

Protected Content