गिरणा नदीत बुडालेल्या ‘त्या’ तरूणाचा मृतदेह वडनगरीत आढळला

जळगाव प्रतिनिधी । हातपाय धुण्यासाठी गेलेला तरूण पाण्यात काल रविवारी बुडाला होता. त्याचा मृतदेह आज सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तालुक्यातील वडनगरी येथे आढळला आहे. जिल्हा रूग्णालयात मृतदेह नेण्यात आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, अधिक माहिती अशी की, पंकज किरण भोई (वय-२४) रा. आव्हाणे ता. जळगाव हा तरूण शेती काम करतो. त्यांचे गिरणा नदीच्या किनाऱ्यावर शेत आहे. आई वडीलांना शेतात पंकज हा लहान भाऊ राधेश्यामसह मदत करतात. रविवारी ४ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शेतातील काम आटोपून पंकज आणि लहान भाऊ राधेश्याम हे पायी घराकडे निघाले होते. दोन्ही भाऊ गिरणा नदी पात्रात हातपाय धुण्यासाठी उतरले. यात पंकज हा हातपाय धुत असतांना नदीतील वाळूच्या खड्ड्चा अंदाज न आल्याने पाण्यात पडला. वाळूच्या खड्ड्यांमुळे पंकज बुडाला. हे पाहून लहान भाऊ राधेश्याम यांने आरडाओरड करण्यास सुरूवात केली होती. रविवारी रात्री उशीरापर्यंत शोधकार्य सुरू होते. आज सकाळीपासून देखील गिरणा नदीजवळी काही पोहणाऱ्या तरूणांनी शोध घेण्यास सुरूवात केली होती. दरम्यान सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तालुक्यातील वडनगरी येथे तरूणाचा मृतदेह गावातील नावाडी याला आढळून आला. अशी माहिती गावातील नागरिक अमोल चौधरी यांनी दिली. याप्रकरणी तालुका पोलीसांना कळविण्यात आले असून मृतदेह जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content