हाथरस अत्याचार प्रकरणी शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने (व्हिडीओ)

जळगाव राहुल शिरसाळे । उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित मुलीवर अत्याचार करणाऱ्या गुंडांना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी शिवसेना यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदनातून केली आहे.

दिलेल्या निवेदना म्हटले आहे की, उत्तरप्रदेश राज्यातल्या हाथरस जिल्ह्यातील एका खेडेगावात राहणाऱ्या दलित समाजाच्या मुलीवर काही गावगुंड प्रवृत्तीच्या लोकांनी तिच्याव अमानुषपणे बलात्कार केला. तिची जिभ कापले, तिच्या हात पायांची हाडे मोडून फरार झाले. रूग्णालयात उपचार घेत असतांना तिचा मृत्यू झाला. अशा गुन्हेगारांना पकडून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

दरम्यान, या घटनेतील पीडितेला आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळायला हवा. या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, उत्तर प्रदेशातील परिस्थिती लक्षात घेता त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशा मागण्या आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या.

यावेळी गुलाबराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे, युवाशक्तीचे विराज कावडिया, शहरप्रमुख ज्योती शिंदे, मनिषा पाटील, उषा जाधव, कविता पाटील, पद्मा चोरडीया, भारती सोनवणे, सुषमा भोई, वंदना कापसे, संगीता काळे, आश्विनी मुंदडा, लता जैन, सुचित्रा महाजन, मनिषा पाटील यांच्यासह शिवसेना महिला पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/674040070216860/

 

Protected Content