रावेर प्रतिनिधी । पुढच्या पंधरा दिवसात हतनुर कालव्याच्या संपादित जमीनीवर केलेले अतिक्रमण तात्काळ काढावे अन्यथा कारवाई करण्यात येईल तसेच भविष्यात देखिल कोणताही पेरा करू नये, असा इशारा उपविभागीय अभियंता शशिकांत चौधरी यांनी केली आहे.
हतनुर कालव्याच्या संपादित जमिनीवर केलेले अतिक्रमण करण्यात आले आहे. हे त्वरीत काढण्यासाठी यावल परिसरातील तक्रारी करण्यात आल्या होत्या. याची गंभीर दखल पाटबंधारे विभागाने घेतली शासनाने संपादित केलेल्या जमिनीवर बऱ्याच शेतकऱ्यांनी किंवा व्यक्तिंनी कोणतीही परवानगी न घेता पिकपेरा केला आहे. या संदर्भात जलसंपदा विभागाकडे संपादित जमिनीवरील अतिक्रमण काढण्याबाबत तक्रार केले असून याबाबत मागील २ वर्षापासून बऱ्याचश्या व्यक्तिंना परवानगी न घेता संपादित जमिन अतिक्रमण करून पिकपेरा केलेला होता, त्यांना यापुर्वी सदरची संपादित जमीन मोकळी करून देण्याबाबत नोटीसा देण्यात आलेल्या होत्या. परंतू कोणीही गांभिर्याने दखल घेऊन संपादित जमिन खाली केली नाही. म्हणून सदरची जमिन पुढच्या 15 दिवसात खाली करावी किंवा भविष्यातही कोणता पिकपेरा करू नये. तसे केल्यास जलसंपदा कायदा 1976 अंतर्गत अतिक्रमण धारकावर कायदेशीर कारवाई करण्यात येऊन फौजदारी गुन्हा दाखल होईल व यास संबंधीत अतिक्रमण धारक शेतकरी जबाबदार राहील असे एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे उपविभागीय अभियंता यांनी केले आहे.