स्व. निखिलभाऊ खडसे यांच्या जयंती निमित्ताने क्रिकेटपटूंचा सत्कार

जळगाव, प्रतिनिधी | स्व . निखिलभाऊ खडसे यांच्या जयंती निमित्ताने नाथ फाऊंडेशनच्या वतीने १४ वर्ष वयोगटातील जळगाव जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहनपर स्मृती चिन्ह तसेच विशेष प्राविण्य असलेल्या खेळाडूंना गोल्डमेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

 

जळगाव जिल्ह्यातील १४ वर्ष वयोगटातील क्रिकेट खेळाडूंमधील बेस्ट फलंदाच , बेस्ट बाँलर , व्हिकेटकिपर , मँन आँफ मँच अशी कामगिरी गृहीत धरत स्मृती चिन्ह तसेच विशेष प्राविण्य असलेल्या खेळाडूंना गोल्डमेडल प्रदान करण्यातआले. या १४ खेळाडूंचा टिशर्ट, क्रिकेटचे किट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव महानगर जिल्हाअघ्यक्ष अशोक लाडवंजारी , जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील , माजी नगरसेवक सुनिलमाळी , सुशील शिदे, सरचिटणीस विशाल देशमुख, विवेक पाटील विखरण ग्रामपंचायत उपसंरपच व महाराष्ट्र T 10 चे सचिव व संघ प्रशिक्षक पंकज महाजन सर संजय हरणे , किरण चौव्हाण इतर उपस्थित होते. भविष्यातील वाटचालीसाठी अशोक लाडवंजारी यांनी खेळाडूना शुभेच्छा व लहानग्या खेळाडूंसाठी जिल्हा स्तरावर स्व निखिलभाऊ खडसे यांच्या स्मृती प्रित्यर्थ लिटिल च्याम प्रीमियर लीग( १४ वर्षाआतील आयपीएल च्या धर्तीवर 20-20 क्रिकेट स्पर्धा ) घेऊ अशी आश्वासन दिले.

Protected Content