स्वप्नाली महालेची विद्यापीठ संघात निवड 

जळगाव, प्रतिनिधी | केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या स्वप्नाली मानसिंग महाले हिची आंतरविद्यापीठ योगा (महिला) स्पर्धेकरिता कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघात निवड झाली.

 

आंतरविद्यापीठ योगा (महिला) स्पर्धा भुवनेश्वर ओडिसा येथे २५ ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान होणार आहे.  या स्पर्धेसाठी विद्यापीठ संघात  स्वप्नाली महाले हिची निवड झाल्याने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे यांच्या हस्ते या खेळाडूचा ट्रॅक सूट व बुके देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. शैलजा भंगाळे, प्रा. प्रवीण कोल्हे हे उपस्थित होते.

Protected Content