विसनजी नगरातील कॅनरा बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील विसनजी नगर मधील कॅनरा बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात एटीएमचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुरुवार 3 नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विसनजी नगरातील कॅनरा बँकेचे एटीएम आहे. या ठिकाणी गुरुवार ३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएम फोडून रोकड लांबविण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांच्याकडून एटीएम फोडले गेले नाही. परंतू यात एटीएम मशीनचे १ लाख ८० हजाराचे मोठे नुकसान झाले आहे. एटीएम मधील रोकड सुरक्षित आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. कॅनरा बँकेचे व्यवस्थापक प्रमोद गुरुनाथ कांबळे (वय-४८) रा. विसजनी नगर,जळगाव यांनी गुरुवारी ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल फिरोज तडवी करीत आहे.

Protected Content