स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजतर्फे कोरोनाग्रस्तांसाठी १५ लाखांची मदत

जळगाव प्रतिनिधी । येथील स्पेक्ट्रम इलेक्ट्रीकल्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीतर्फे कोरोनाग्रस्तांसाठी पीएम केअर निधीत १५ लाख रूपयांची मदत करण्यात आली आहे.

स्पेक्ट्रम इलेक्ट्रीकल्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही शेअर बाजारात लिस्टेड असणारी कंपनी असून याचे चेअरमन उद्योजक दीपक चौधरी हे आहेत. कंपनीतर्फे वेळोवेळी सीएसआरच्या माध्यमातून सामाजिक कार्यांना मदत केली जाते. सध्य कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून याच्या प्रतिकारासाठी मोठ्या प्रमाणात प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजने मदत जाहीर केली आहे. या अनुषंगाने कंपनीचे चेअरमन दीपक चौधरी यांनी पीएम केअर फंडामध्ये १५ लाख रूपये मदत म्हणून जमा केले आहेत. या संदर्भात एका पत्राच्या माध्यमातून भूमिका मांडतांना दीपक चौधरी यांनी कोरोनाच्या आपत्तीच्या प्रतिकारासाठी सुरू असणार्‍या प्रयत्नांना पाठबळ मिळावे म्हणून स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजतर्फे मदत करण्यात आल्याचे नमूद केले आहे.
दरम्यान, स्पेक्ट्रमतर्फे करण्यात आलेल्या मदतीचे खासदार उन्मेषदादा पाटील यांनी स्वागत केले आहे.

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content