अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात सन २००६-०७ या वर्षी शिक्षण पूर्ण केलेल्या एम.ए.मराठी बॅचच्या विद्यार्थ्यांचे गेट टुगेदरचा कार्यक्रम अमळनेर शहरालगत असलेल्या निसर्गाच्या सानिध्यात डुबकी मारोती या धार्मिक स्थळी उत्साहपूर्ण वातावरणात नुकताच संपन्न झाला.
आज काल मोबाईल वापरामुळे जरी मैत्री एकमेकांच्या संपर्कात असली,तरी प्रत्येक्षात सर्वजण एकत्रित आल्याचा आंनद हा वेगळाच असतो. असाच काहीसा अनुभव तब्बल सोळा वर्षांनंतर भेटलेल्या प्रतापियन्स यांना आला.जवळपास 16 वर्षांनंतर स्नेहमेळावा निमित्त एकत्रित आलेले मित्र मैत्रिणी एकमेकांना भेटल्यावर आनंदित होवून जुन्या आठवणींना उजाळा दिला.शैक्षणिक वर्ष संपल्यावर सर्वजण व्यवसायात,नोकरी तसेच प्रपंचात यशस्वी व आनंदित असल्याचे सगळ्यांनी बोलून समाधान व्यक्त केले.मानवी जीवनात सुख आणि दुःख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असतील,मात्र काहींना आयुष्यभर संघर्ष करावा लागतो.असे काहीसे अनुभव व्यक्त होताना मित्रांनी शब्दांना वाट मोकळी करून दिली. कौटुंबिक रित्या सर्वच मित्र मैत्रिणी आज खुश असून,परिचय करून दिला. कामाच्या व्यापामुळे ज्या मित्रांना येणे शक्य झाले नाही;त्यांनाही व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून सहभागी करून घेतले.यासाठी दीपक खोंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
दरम्यान या गेट टूगेदर साठी पालघर नाशिक ओझर मुंबई आदी ठिकाणांहून मित्र एकत्र आले होते. सदर स्नेहमीलन यशस्वीतेसाठी डॉ. राहुल पाटील, दीपक खोंडे, वैशाली चव्हाण, जोति कोळी, हेमलता सावंत मोरे, गजानन पाटील, मुकेश शिसोदे, प्रमोद चौधरी, अलकेश कुंभार, प्रदीप महाजन, रेखा पाटील, ईश्वर पाटील, मनीषा पाटील, मनीषा पवार, पल्लवी सुर्यवंशी, दीपमाला नाथबुवा आदींनी परिश्रम घेतले. शेवटी सर्वजण स्नेहभोजन करून भावी जीवनासाठी एकमेकांना शुभेच्छा दिल्या तसेच लवकरच पुन्हा भेटू असा संदेश देत निरोप घेतला.