अग्रवाल समाजातर्फे निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिर

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे अग्रवाल समाजातर्फे भव्य अशा निःशुल्क मेडिकल चेक अप कॅम्पचे आयोजन करण्यात आले.
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

शहरातील जारगाव चौफुली नजिक असलेल्या रामदेव लॉन्समध्ये पाचोरा अग्रवाल समाजातर्फे २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून भव्य अशा निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिर आणि औषध वाटप कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या मेडिकल कॅम्पमध्ये रक्त तपासणी, हदयरोग, दंत रोग, नेत्र रोग, बाल रोग, फिजिओथेरपी, स्री रोग, जनरल फिजीशन, ई.सी.जी., टू डी इको, सोनोग्राफी, मोफत तपासणी करण्यात आली. या निःशुल्क मेडिकल चेक अप कॅम्पचा असंख्य समाज बांधवांनी आपल्या शरिराची तपासणी करुन घेतली.

यावेळी डॉ. भूषण मगर (पाटील), डॉ. सागर गरुड, डॉ. राहुल पटवारी, डॉ. अर्चना पटवारी, डॉ. अनुप अग्रवाल, डॉ. विकास केजडीवाल, डॉ. मनिष अग्रवाल, डॉ. सिमरन अग्रवाल, डॉ. राहुल लक्ष्मीकांत पटवारी, डॉ. ऊर्जा पटवारी, डॉ. श्रद्धा पाटील, डॉ. आनंद जैन, डॉ. सरिता अग्रवाल, डॉ. सचिन अहिरेष सचिन वाघ, डॉ. जितेन पाटील, डॉ. कुणाल इसराने आदी वैद्यकतज्ज्ञांची उपस्थिती होती.

तसेच या तपासणी शिबिराला संदिप महाजन, मयूर विसपुते, अग्रवाल समाज अध्यक्ष मोहन अग्रवाल अध्यक्ष सीताराम अग्रवाल, अग्रवाल युवामंच अध्यक्ष निखिल मोर, अग्रवाल महिला मंडळ अध्यक्ष संगीता अग्रवाल, अग्रलक्ष्मी बहू मंडळ अध्यक्षा सिद्धी अग्रवाल, माजी अध्यक्षा टीना अग्रवाल, गोपाल पटवारी, राजेश पटवारी, कृष्णा अग्रवाल, संजय पटवारी लक्ष्मीकांत पटवारी रमेश अग्रवाल लवकिक अग्रवाल, पवन अग्रवाल, राजेश मोर, दिनेश अग्रवाल , यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सर्व समाज बांधव, पत्रकार बांधव उपस्थित होते.

Protected Content