स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकला : तालुका भाजपा मागणी (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी  ।ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असतांना सहा जिल्ह्यात होत असलेल्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी  मागणी  जि. प.उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली  भारतीय जनता पार्टी जळगाव तालुकातर्फे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तहसीलदारांमार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली.

 

निवेदनाचा आशय असा की,    धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, पालघर व नागपूर येथील निवडणूका शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जाहीर झाल्या जर या आघाडी सरकारने वेळीच इंपेरिकल डेटा कोर्टाला दिला असता तर आज आमच्या ओबीसी बांधांवर निवडणुकीतून हद्दपार व्हायची वेळ आली नसती पण या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला ओबीसींचे आरक्षण जाणून बुजून काढून घ्यायचे होते म्हणून त्यांनी कोर्टाला इम्पेरियल डेटादिला नाही व ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले म्हणजेच या सरकारने मागासवर्गीय आयोग नेमून सुद्धा कुठलीही कार्यवाही केली नाही फक्त आणि फक्त ओबीसी समाजाला आशेवर ठेवून पद्धतशीरपणे निवडणुकीतून बाजूला केले म्हणून ह्या सरकारचा ओबीसी समाजाच्या वतीने व भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध. या पुढे ओबीसी समाजाने शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस सरकारला निवडणुकीतून हद्दपार करण्यासाठी एकजुटीने लढण्याची व ह्या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. सदर निवेदना मार्फत आम्ही अशी विनंती करतो कि जो पर्यंत राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण लागू होत नाही तो पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक घेण्यात येऊ नये.

निवेदन देतांना भाजपा जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष गोपाल भंगाळे, माजी जिल्हा सहचिटणीस प्रभाकर पवार,   तालुका सरचिटणीस अरुण सपकाळे, जिल्हा सरचिटणीस प्रकाश सोनवणे, तालुका सहचिटणीस संदीप पाटील, माजी अध्यक्ष संजय भोळे, जिल्हा चिटणीस विनोद साबळे, पं.स. सदस्य मिलिंद चौधरी, माजी उप सभापती मनोहर पाटील, युवा सरचिटणीस सुहास राजपूत,  युवा चिटणीस योगेश पाटील, सरपंच आधार पाटील, पवन पाटील, ईश्वर मराठे, माजी सरचिटणीस प्रकाश बारी, ओबीसी अध्यक्ष शांताराम वानखेडे, अनुसूचित जमाती अध्यक्ष सुभाष पवार, नितीन पाटील, महिला प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, महिला आघाडी अध्यक्षा दीप्ती चिरमाडे आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/6041764809230525

 

Protected Content