रावेर पं. स. शेष फंडमध्ये भष्ट्राचार – आनंद बाविस्करांचा आरोप

रावेर प्रतिनिधी | रावेर पंचायत समितीच्या शेष फंडमध्ये भष्ट्राचार झाल्याचा गंभीर आरोप निळे निशान सामाजिक संघटनेन केला आहे. इतकेच नव्हे तर एकाच कुटुंबाच्या पाच जणांना तात्कालीन गट विकास अधिका-यांनी नियम धाब्यावर बसवुन लाभ दिल्याचा आरोप आनंद बाविस्कर यांनी केला आहे.

दलितवस्ती नंतर पंचायत समिती शेष फंड योजना भ्रष्ट्राचारामुळे पुन्हा चर्चेत आली आहे.एकाच कुटुंबातील पाच जणांना विविध योजनेचा लाभ नियम धाब्यावर बसवुन दिल्याचा गंभीर आरोप आनंद बाविस्कर यांनी केला आहे.आज पुन्हा निळे निशान सामाजिक संघटने पंचायत समितीत निवेदन देऊन मागणी केली आहे.

निवेदनावर अश्या आहे मागण्या

निळे निशान सामाजिक संघटने दिलेले निवेदनाद्वारे २०१६/२१ संबधित लाभार्थीची आवक-जावक प्रत मिळावी वैयक्तिक शौचालयाची निकष कसे लावले. संबधित लाभार्थीच्या नावांची सभागृहाची ठराव केला आहे का.? मासिक सभेतील ठरावांची नक्कल मिळावी.यासह इतर मागण्याचे निवेदन आज पंचायत समितीला निळे निशान सामाजिक संघटने तर्फे देण्यात आले आहे.

Protected Content