स्ट्रोन क्रेशरचे कार्यालय फोडून ५० हजारांची चोरी

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्ट्रोन क्रेशरवर दगड फोडण्याचा आवाज आल्याचा रागातून मालखेडा गावातील २० ते २५ जणांनी येवून नर्मदा स्टोन क्रेशनच्या व्यावस्थापकाला शिवीगाळ करून कार्यालयातील सामानांचा तोडफोड करून ६० हजारांचे नुकसान केले तर टेबलातील ५० हजारांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, जामनेर तालुक्यातील मालखेडा शिवारात नर्मदा स्टोन क्रेशर असून त्याचा ठिकाणी कार्यालय देखील आहे. ३० जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मालखेडा परिसरात दगड फोडण्याचा आवाज आला. या कारणावरून मालखेडा गावातील २० ते २५ तरूणांनी येवून नर्मदा स्टोन क्रेशरचे कार्यालयातील सामानांची तोडफोड करून ६० हजारांचे नुकसान केले. तर टेबलातील ५० हजारांची रोकड चोरून नेली. हा प्रकार घडल्यानंतर टिकेश दिपक मगर उर्फ पप्पुदादा रा. पाचोरा यांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारी वरून अज्ञातांवर दरोड्यांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहे.

Protected Content