ट्रॅक्टरवरून पडल्याने महिलेचा उपचारादरम्यान दुदैवी मृत्यू

जामनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ट्रॅक्टरवर बसलेल्या महिला खाली पडल्याने जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना जामनेर तालुक्यातील टाकरखेडा शिवारातील शेतात घडली आहे. याप्रकरणी शनिवारी १ जुलै रोजी दुपारी १ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील नाचणचौकी गावात चंद्रकलाबाई अनिल सोनवणे या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला होत्या. २६ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्या अनिल विश्ननाथ पाटील यांच्या ट्रॅक्टरवर बसून घरी येत होत्या. त्यावेळी ट्रॅक्टर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून ट्रॅक्टर चालविल्याने चंद्रकलाबाई सोनवणे ह्या ट्रॅक्टरवरून खाली फेकल्या गेल्या. त्या अपघातात त्यांच्या पाठीला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जामनेर ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी मयत महिलेचे पती अनिल फुलसिंग सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरचालक अनिल विश्वनाथ पाटील याच्यावर जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मुकुंद पाटील करीत आहे.

 

Protected Content